धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील बस स्थानकातुन आवक जावक करणा-या बस गाड्याची तपासणी करावी. खराब झालेल्या बसेस दुरुस्ती करुन प्रवाशांची गैरसोय टाळावी. अशा प्रकारचे लेखी निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी बस स्थानक व्यवस्थापक बालाजी भांगे यांच्या कडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बस गाड्यामधुन अनेक प्रवासी प्रवास करतात. लांब पल्ल्याच्या गाड्या असतील या इतर बसेस यातील ब-याच बस गाड्याची अवस्था बिकट झाली आहे. या गाड्या भंगार होत असुन मोडकळीस आलेल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस असुन काही बस गाड्यात पावसाचे पाणी पडते. तर काही गाड्या भर रस्त्यात बंद पडुन प्रवाशांच्या गैरसोई होत आहेत. तर काही गाड्याचे अपघातही होतांना आपणाला दिसत आहे. यापासुन प्रवाशांनाच नव्हे तर गाडी चालविणारे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांच्या ही जीविताला धोका निर्माण झाला आहे. या बस गाड्या आपण प्रवासी वाहतुकीतुन बाजुला काढल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी नविन बसेस व खराब झालेल्या बसेस दुरुस्ती करुन वापरात आणल्या पाहिजेत. याबाबत आपण आपल्या वरिष्ठांना कळविले पाहिजे. आपल्या स्थानकातुन आवक-जावक करणाऱ्या बस गाड्याची तपासणी करून ज्या योग्य बस गाड्या आहेत त्यातुनच प्रवाशांची सोय करुन पुढील काळात घडणाऱ्या दुर्दैवी घटनेपासुन प्रवाशांना सुरक्षा द्यावी. असे लेखी निवेदन सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी बस स्थानकाचे व्यवस्थापक बालाजी भांगे यांच्याशी सविस्तर चर्चा करुन देण्यात आले. याची एक प्रत जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आली.