परंडा (प्रतिनिधी) - शहरातील दिव्यांग बांधवांना नगरपालिका हद्दीतील दिव्यांगाना दिव्यांग कायद्यानुसार शासन निर्णयानुसार दिव्यांग 5% निधी मिळावा. तसेच गेल्या वर्षी देखील दिव्यांग बांधवांना निधी मिळालेला नाही तरी येथील  पालिकेचे मुख्याधिकारी यांनी सर्व दिव्यांग बांधवांचा तात्काळ निधी संदर्भात विचार करावा नगरपालिकेकडून आम्हाला मदत व्हावी आम्हाला आमचे जीवन जगणे यासाठी आर्थिक मदत म्हणून भर पडण्यास मदत होईल  याकरिता आपण दिव्यांगांना पाच टक्के निधी सरसकट वाटप करावा या मागणीसाठी सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

यावेळी निवेदन देताना दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख तानाजी घोडके, शहराध्यक्ष गोरख देशमाने, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य दत्तात्रेय रणभोर (महाराज), महेश देशमुख, महेबुब दामटे, नासेर शेख, अनंत लोखंडे नाना तुटके,आदी शहरातील सर्व सहकारी दिव्यांग बांधव व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

 
Top