तेर (प्रतिनिधी )-धाराशिव तालुक्यातील तेर जवळील पानवाडी या छोट्याश्या गावातील पृथ्वीराज सुभाष कदम याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत यश मिळविले आहे. त्याचा कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजला केंद्रीय मेडिकल कौन्सिल कमिटीच्या पहिल्याच फेरीत प्रवेश झाला आहे. या यशाबद्दल त्याचे तेरसह परिसरात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. तो पत्रकार तथा पोलीस पाटील संघटनेचे मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम-पाटील यांचा मुलगा आहे.

पानवाडी येथील पृथ्वीराज कदम याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण धाराशिव शहरातील इंग्रजी माध्यमाच्या तेरणा पब्लिक स्कूल (सीबीएसई) येथे झाले. उच्च माध्यमिकचे शिक्षण लातूर येथील संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल (सीबीएसई) येथे झाले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही पृथ्वीराजच्या पालकांनी त्याला धाराशिव व लातूर येथील इंग्रजी माध्यमाच्या केंद्रीय दिल्ली बोर्डाच्या  सीबीएसई शाळेत प्रवेश घेऊन दर्जेदार शिक्षण दिले. पृथ्वीराजने पालकांच्या कष्टाची जाणीव ठेऊन नीट परीक्षेचा कोणत्याही प्रकारचे खाजगी क्लासेस न लावता अभ्यास केला. त्याचा पहिल्याच राऊंडमध्ये मेरिट यादीतून कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजला दि. 29 ऑगस्ट रोजी प्रवेश झाला आहे. त्याने पानवाडी गावातून पहिला डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला आहे.

या यशाबद्दल त्याचे शिक्षक सीताराम कदम, काकासाहेब डोंगरे, नानासाहेब सावतर, सोमनाथ डोंगरे, प्रेमनाथ डोंगरे, सचिन गाढवे, सोमनाथ शेंडगे, तुषार कदम, अमर कदम, मनोज माने, शरद माने,जयचंद कदम, सुरेश कदम, सूर्यकांत ढगे, डॉ. लक्ष्मण माने, बबन डोंगरे, रमाकांत ढगे, अनिकेत कदम, अमोल कदम, समाधान कदम, शाम कदम, विशाल कदम, बालाजी कांदे, आदींनी पृथ्वीराजचे अभिनंदन करून पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top