भूम (प्रतिनिधी)- आरोग्य दूत डॉ.राहुल घुले यांनी दि. 8 सप्टेंबर रोजी भूम येथील कार्यालयात त्यांच्या  समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये डॉ. राहुल घुले आरोग्य मित्र परिवाराच्या वतीने भूम परंडा वाशी तालुक्यात चालू असलेले सामाजिक उपक्रम यापुढे चालूच राहतील अशी माहिती आरोग्यमित्र डॉ. राहुल घुले यांनी  दिली.

डॉ. राहुल घुले मित्र परिवाराच्या भूम परंडा वाशी तालुक्यातील समर्थकांच्या आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आरोग्य परिवाराच्या वतीने या तालुक्यात मोफत ऑपरेशन, वयोवृद्ध नागरिकांना आधाराची काठी तसेच शेतकऱ्यांना डीपी वाहतूक तसेच विविध कार्यासाठी मोफत भांडे या उपक्रमाबाबत झालेल्या बैठकीत समाधान व्यक्त केले. यापुढील काळात डॉ. घुले यांच्यामार्फत समाजातील नागरिकांसाठी हे उपक्रम जोमाने चालू राहतील. तसेच आपण समाजासाठी आणखी काय करू शकतो याबाबत ही चर्चा करण्यात आली. तसेच कमल घुले फाउंडेशन मार्फत आणखी काही उपक्रम राबवता येत असल्यास ते नक्कीच राबवून आपण समाजाचे सेवा करण्याची संधी चालू ठेवणार असल्याचे यावेळी डॉ. घुले यांनी बैठकीत बोलताना सांगितले. सदर बैठकीत डॉ. घुले यांच्यावर प्रेम करणारे भूम परंडा वाशी तालुक्यातील जवळपास 400 पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top