परंडा (प्रतिनिधी) -सेवा सहयोग फाउंडेशन मुंबई व ब्युरो व्हेरीटस कंपनी अंधेरी मुंबई यांचाकडून 15 स्कूल कीट दि. 8 सप्टेंबर रोजी वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास माजी नगरसेविका वाहिदाबी तांबोळी व कन्या  प्रशालेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे  शिक्षण तज्ञ सदस्य अब्दुल गनी हन्नुरे,मुख्याध्यापक दिनकर पवार  यांच्या हस्ते गरजू व होतकरू मुलींना स्कूल कीट वाटप करण्यात आले. सदर किट मध्ये कंपासपेटी, चित्रकला वही, इंग्रजी डिक्शनरी व आठ रजिस्टर इत्यादी शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती शुभांगी देशमुख यांनी केले प्रास्ताविक भाऊसाहेब सुर्यवंशी यांनी केले. तर आभार  प्रदर्शन आबासाहेब माळी यांनी केले. 

या कार्यक्रमास मीनाक्षी मुंडे, रेखा उसराटे, गीता मांडलिक व पालक आदींची उपस्थिती होती. स्कूल कीट मिळवून देण्यासाठी पवारनगर शाळेचे शिक्षक व सेवा सहयोग फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक  विनोद सुरवसे व जिल्हा परिषद प्रशाला परंडाचे शशिकांत माने यांचे विशेष सहकार्य लाभले.

 
Top