धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक धाराशिव या ठिकाणी भारतीय जनता पार्टी,भारतीय जनता युवा मोर्चा, अ.जा.मोर्चा व भारतीय जनता पार्टी सर्व मोर्चे ,आघाडी धाराशिव यांच्या वतीने आरक्षण विरोधी राहुल गांधी यांच्या आरक्षण संपवण्याबाबतच्या वक्तव्यामुळे त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
अमेरिकेतील वॉशिंग्टन या ठिकाणी प्राध्यापक व संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते तथा काँग्रेसचे सर्वोसर्वा राहुल गांधी यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित घटकांना दिलेले आरक्षण आम्ही सत्तेत आल्यानंतर कालांतराने संपवून टाकू अशा पद्धतीचे बेजबाबदारपणाचं आणि सर्व वंचित शोषितांना चीड आणणारे वक्तव्य केले. इंडी आघाडीने व काँग्रेसने मागील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपा सत्तेत आल्यानंतर राज्यघटना बदलणार आहे आरक्षण संपवणार आहे अशा पद्धतीचे संभ्रम तयार करणारे वक्तव्य करून लोकांमध्ये भीती निर्माण करून खासदार निवडून आणले आणि तेच आता आरक्षण संपवण्याची भाषा करत वक्तव्यातून त्यांनी त्यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलेला आहे.आरक्षणाला हात घालण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी कदापी माफ करणार नाही अशा पद्धतीचा सज्जड दम देखील आंदोलनावेळी दिला. या वक्तव्याच्या निषेधार्थ धाराशिव येथे राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन भाजप प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार व तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वात व माजी आमदार सूजितसिंह ठाकुर, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,प्र का स प्रवीण पाठक,युवराज नळे, सरचिटणीस दीपक आलुरे, इंद्रजित देवकते, सुनील काकडे, विक्रमसिंह देशमुख, किसान मोर्चाचे रामदास कोळगे, गुलचंद व्यवहारे, तालुका अध्यक्ष राजाभाऊ पाटील, संतोष बोबडे, शहर अध्यक्ष अभय इंगळे, प्रदेश चिटणीस अ.जा.मोर्चा सचिन लोंढे, अ.जा.मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पेठे, विजय शिंगाडे, बापू पवार,विद्या माने, माजी नगरसेवक दत्ता पेठे,विलास लोंढे यांनी आपल्या मुलाखतीतून तीव्र शब्दात राहूल गांधी यांचा निषेध व्यक्त केला.
प्रसंगी जिल्हाभरातून भारतीय जनता पार्टी चे वसंत वडगावे ,अमोल राजेनिंबाळकर, विनोद निंबाळकर, संदीप इंगळे, पुष्पकांत माळाळे, संग्राम बनसोडे, अमोल पेठे, प्रवीण पाठक,सुनील तात्या काकडे, दीपक दादा आलूरे, सचिन लोंढे, विनोद निंबाळकर, अरुण पेठे, रवी मंजुळे, सतीश जाधव, सुनील पंगुडवाले, राहुल शिंदे, बालाजी तेरकर, रोहित देशमुख, आशिष नायकल, अप्पा नाईकवाडी, संतोष वाघमारे, महादेव पाटील, सुरज लोंढे, ऋषी मगर, सुरज मगर, विशाल मगर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.