धाराशिव (प्रतिनिधी)- ओबीसी बहुजन पार्टी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागा लढवणार आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभेच्या चारही जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी रविवारी दि.1 संप्टेबर 2024 रोजी धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृह पोलीस मुख्यालय समोर सकाळी दहा वाजता बैठक ठेवण्यात आली आहे. चारही मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांनी कार्य अहवाला सोबत उपस्थित रहावे असे आवाहन ओबीसी बहुजन पार्टी जिल्हाध्यक्ष सचिन नाना शेंडगे यांनी केले आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस अरुण जाधवर उपस्थित राहणार आहेत.