धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील अवधूत वाडी येथील भाग्यश्री शिवकुमार अवधूत यांची एमपीएससी परीक्षेमधून पीएसआयपदी निवड झाल्याबद्दल

दहिफळकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अच्युत महाराज मते, सरपंच चरणेश्वर पाटील, उपसरपंच अभिनंदन मते, पांडुरंग मते तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तात्या भातलवंडे, भाऊसाहेब मते, ज्ञानेश्वर आडसुळ, शंकर भातलवंडे, रामेश्वर मते,भगवंत मते, वसंत किलचे, दिनेश, जयवंत भातलवंडे,नारायण भातलवंडे , दिनेश काकडे, रामेश्वर मते अदी मान्यवरांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ, ट्रॉफी मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना अवधूत म्हणाल्या की लग्न झाल्या नंतर मी मी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला.शेतात कष्ट खुप होते.मी डी एड केले असल्यामुळे मला शेतात काम करायला आवडत नव्हते.मी घरच्यांना सांगितले मी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करायचा आहे.सगळ्यांनी होकार दिला व मी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करून परिक्षा दिली.अनेक प्रयत्नानंतर यश मिळाले.पोलिस म्हणून मी कार्यरत असताना एम पी एस सी ची परिक्षा द्यायचे ठरवले. नोकरी करत करत,घर सांभाळत रात्र रात्र जागून अभ्यास केला.मेहनतीचे फळ मिळाले.आज दहिफळकरांनी माझा सत्कार केला याचा मला अभिमान आहे.गावातील मुलांना स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करायला लावा मी त्यांना मार्गदर्शन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

गावातील सत्कार झाल्यानंतर येथील जि प प्रशालेत सत्कार समारंभ संपन्न झाला.विद्यार्थ्यांना अवधूत यांनी संबोधित केले.त्या म्हणल्या शाळेत असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.ध्येय ठरवलं पाहिजे.आज तुम्ही जे ठरविले ते नक्कीच मिळेल.ध्येय ठेवल्याशिवाय मार्ग दिसत नाही.आधी ध्येय ठरवा असे विद्यार्थ्यांना अहवान केले.यावेळी मुख्याध्यापक सावंत, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष, सदस्य,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top