धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि. कारखान्याच्या वतीने 16 ते 19 ऑगस्टपर्यंत सकाळ व सायंकाळी अश्या दोन सत्रात विभागवार उस विकास कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शनिवारी (दि.17) सायंकाळ सत्रात नळदुर्ग विभागातील शाहपूर या गावात आधुनिक ऊस लागवट तंत्रज्ञान या विषयावर शेतकरी मेळावा घेण्यात आला. त्यास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील व भागातील शेतकऱ्यांची भौगोलिक व आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने कारखान्यामार्फत विभागवार ऊस विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. शेतकरी मेळाव्यात उपस्थित शेतकयांना वसंतदादा शुगर इंन्सीट्यूट, पुणे या संस्थेचे माजी शास्त्रज्ञ डॉ. सुरेश माने पाटील यांनी अधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञानाचे आधारे शेती करावी. तसेच ऊस बेणे निवड, अंतरमशागत, खताचे व्यवस्थापन, रोग व तनांचे नियंत्रण, सरी पाडण्याचे सुयोग्य पद्धत या विविध विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी कारखान्याचे जनरल मॅनिजर सतिष वाकडे यांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात मांजरा शुगर इंडस्ट्रीज, कारखाना मांजरा परिवाराचा अविभाज्य घटक झाला. हंगाम सुरू होण्याचा अवधी कमी असतानासुद्धा कारखाना व्यवस्थापनाचे मार्गदर्शनानुसार व ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या सहकार्याने मागील हंगामाचे गाळप यशस्वीपणे पूर्ण केले. मांजरा परिवाराचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांचे दूरदृष्टीकोनातून कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांची आर्थीक उन्नती व कारखाना कार्यक्षेत्रात अर्थक्रांती होणे करीता ऊस उत्पादन वाढविण्याचे दृष्टीने कारखान्या मार्फत ऊस विकास योजना प्रभावीपणे राबवण्याचे लक्ष ठेवले आहे. त्याप्रमाणे कारखान्याने नियोजन केले असून त्यास शेतकयाचा भरीव प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे. कमी क्षेत्रात सुयोग्य नियोजन करून जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणे ही काळाची गरज बनली आहे. पुढे बोलताना सांगितले की कारखाना व्यवस्थापनाचे, आदेषानुसार शेतकयांचा ऊस वेळेत गाळपास येणेसाठी मशिनरी आधुनिकीकरणाची कामे तसेच मशिनरी दुरुस्तीची कामे करण्यात येत असून ती अंतिम टप्यात आहेत. 15 सप्टेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन कारखाना गाळपासाठी सज्ज होईल. भागातील शेतकऱ्यांचे ऊसाचे संपूर्ण गाळप होण्यासाठी कारखान्याने 30 हार्वेस्टर मशिन खरेदी केले असून सक्षम ऊसतोड वाहतूक यंत्रणा भरती करण्यात आली आहे. जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मांजरा शुगर कारखान्यास ऊस गाळपास पाठवून सहकार्य करण्याची विनंती केली. सदर शेतकरी मेळाव्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक माजी शास्त्रज्ञा डॉ. सुरेश माने पाटील, शहापुरचे सरपंच उमेश गोरे, उपसरपंच नानासाहेब पाटील, लक्ष्मण मोरे, पोलीस पाटील बालाजी खरात, कारखान्याचे जनरल मॅनेजर सतिष वाकडे, जनरल मेनेजर (टेकनी.) अजित कदम, मुख्य शेतकरी अधिकारी श्री घांडे, उस विकास अधिकारी बुलबुले, सर्व विभागप्रमुख, गटप्रमुख व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

 
Top