तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी कनिष्ठ महाविद्यालय तुळजापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या 37 व्या स्मृतिदिना निमित्त कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तुतारी भित्तिपत्रिकेचे आयोजन केले होते. सदर प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा धनंजय लोंढे, प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर,प्रा अनिल नवत्रे, प्रा सौ बाबर,प्रा सौ कदम,प्रा वागदकर,प्रा वसावे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.