धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील एका तरूणाला ऑनलाईन जॉबचे आमिष दाखवून 18 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 29 वर्षीय सागर राम साळुंके असे या तरूणांचे नाव असून, तो सध्या धाराशिव शहरातील गणेशनगर या भागात राहयला आहे. 

फिर्यादी सागर राम साळुंके यांच्या मोबाईलवर मोबाईल नंबर 7320982450 च्या व्हाट्सॲप वरून जॉब संदर्भात मॅसेज आला की टास्क पूर्ण केल्यास जास्त पैसे मिळतील. त्या संदर्भातील वेगवेगळे ईकॉनॉमिक टास्क पूर्ण केल्यास जास्त मिळतील याचे आमिष दाखवून सागर साळुंके यांना वेगवेगळ्या खाते नंबरवर युपीआय आयडीवर पैसे भरण्यास सांगून 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान मोबाईल फोनवर बॅक खात्यातून ऑनलाईन 18 लाख 14 हजार भरले. त्याबद्दल्यात सागर साळुंके यांना कोणतीही रक्कम परतावा मिळाली नसून, त्यांची ऑनलाईन फसवणूक झाली. सागर साळुंके यांनी 9 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून साबयर पोलिस ठाणे येथे भा. न्या. सं. कलम 318(1) सह 66 (सी), 66 (डी) माहिती तंत्रज्ञान सुधारणा कायदा 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. 

 
Top