धाराशिव (प्रतिनिधी)- मन:शांतीसह आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी केले आहे. 

ज्यांचे वय वर्षे 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना व ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाखाच्या आत आहे,अशा जेष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मन:शांती तसेच आध्यात्मीक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली आहे.अशा ज्येष्ठ नागरिकांनी 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत समाजकल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावा,असे सहाय्यक आयुक्त  समाज कल्याण यांनी केले आहे.  योजनेची माहिती अर्जाचा नमुना, सोबतची प्रपत्रे कार्यालयासह http://samajkalyandharashiv.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.


 
Top