धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसराचा 20 वा वर्धापन दिन उत्साहात करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरु  प्रा. डॉ. विजय फुलारी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. माजी प्राचार्य तथा जेष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ञ, डॉ. वेदकुमार वेदालंकार यांना जीवनसाधना पुरस्कार प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे, कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी, आणि व्यासपीठावरील  मान्यवर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

सर्व प्रथम विद्यापीठ उपपरिसरातील हिरवळीवर कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते विद्यापीठाचा ध्वज फडकविण्यात आला. सत्कारमूर्ती माजी प्राचार्य तथा जेष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ञ, डॉ. वेदकुमार वेदालंकार, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र- कुलगुरू प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. अंकुश कदम, बसवराज मंगरूळे, विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य नितीन जाधव, डॉ. गजानन सानप, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय साळुंके, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. वैशाली खापर्डे, प्रा. डॉ. भगवान साखळे, डॉ. गौतम पाटील, डॉ. भारत खंदारे, दत्तात्रय भांगे, डॉ. व्यंकट लांब, डॉ. अपर्णा पाटील, काशिनाथ देवधर, अधिसभा सदस्य देविदास पाठक, नाना गोडबोले, प्रा. डॉ. भास्कर साठे, वित्त व लेखाधिकारी श्रीमती सविता जंपावाड, डॉ. दत्तात्रय भांगे, आदि उपस्थित होते. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, स्वातंत्र्य सैनिक बुबासाहेब जाधव, विद्यापीठ उपपरिसराचे माजी संचालक प्राचार्य डॉ. रमेश दापके, प्राचार्य डॉ. अशोक मोहेकर, प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आणि प्राचार्य डॉ. हरिदास फेरे, प्राचार्य डॉ. प्रशांत चौधरी, प्राचार्य डॉ. सुनील पवार, प्राचार्य डॉ. गुलाब राठोड कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्र- कुलगुरू प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांनी केले. रुसा माध्यमातून अनेक प्रकल्प सुरु केले आहेत. एनआयआरएफ मध्ये भारतात आपले विद्यापीठ पहिल्या पन्नास मध्ये आहे. नविन शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी कार्य शाळा घेण्यात आल्या आहेत. कुलगुरुंचे चांगले मार्गदर्शन लाभत आहे. प्रशासन कर्मचारी बाबतीत चांगला विचार करित आहे. उपपरिसर वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, असे विचार प्र- कुलगुरू प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे यांनी व्यक्त केले आहेत. उपपरिसराच्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण व साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी प्राचार्य तथा जेष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ञ प्रा. डॉ.  वेदकुमार वेदालंकार यांना जीवनसाधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जीवनसाधना पुरस्कार मानपत्र वाचन डॉ. महेश्वर कळलावे यांनी केले. डॉ. वेदकुमार वेदालंकार यांनी संत तुकाराम महाराज  यांच्या अभंगाचा  हिंदी अनुवाद केला आहे. अनेक संस्कृत ग्रंथाचा हिंदी अनुवाद  त्यांनी केला  आहे. “जीवन के स्वर”  आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. “सामवेद” या ग्रंथाचा हिंदी अनुवाद, संत एकनाथ महाराज यांच्या अभंगाचा हिंदी अनुवाद करण्याचे महत्वपूर्ण  कार्य त्यांनी केले आहे. जीवनसाधना पुरस्कार सत्कारमूर्ती डॉ. वेदकुमार वेदालंकार यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी म्हटले कि जीवन साधना, अलौकिक कार्य अध्यात्मिक प्रेरणेने केले आहे. या कार्याची नोंद घेऊन विद्यापीठाने पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. छावा ग्रंथाचे भाषांतर हिंदीमध्ये आठ महिन्यात केले. दिव्य प्रेरणेने सर्जनशील कार्य करणे शक्य झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पुरस्कार देऊन गौरव केला, त्याबद्दल मी धन्य आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या तीन कादंबऱ्या व वीस कथांचा हिंदीत अनुवाद केला. समारंभाचे प्रमुख अतिथी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. या सत्काराच्या कार्यक्रमाने भारावून गेलो आहे, असे त्यांनी म्हटले. सत्कारमूर्ती डॉ. वेदकुमार वेदालंकार यांना शतकोत्तर कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यापीठ उपपरिसरातील सर्व शैक्षणिक विभागाचे कार्य प्रशंसनीय आहे. जगात अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही. वीस वर्षांत विद्यापीठ उपपरिसराची प्रगती अभिमानास्पद झालेली आहे. एखाद्या शिक्षण संस्थेचे मूल्यमापन किती विद्यार्थी जीवनात यशस्वी झाले आहेत यावर अवलंबून आहे. त्यांनी विद्यापीठ उपपरिसरातील रसायनशास्त्र विभागाचे विशेष कौतुक केले. नेट, सेट परिक्षेत रसायनशास्त्र विभागातील 80 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. स्टेम सेल मधुन उपचारासाठी किडनी, ह्रदय तयार करता येते. लोकांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे हे विद्यापीठाचे काम आहे. एकविसाव्या शतकात देश महासत्ता बनत आहे. आपली सर्वात मोठी शक्ती विविधता आहे. जगात सगळ्यात गरीब लोक आपल्या देशात आहेत. कृषी संस्कृतीतून आपण ज्ञान संस्कृतीकडे प्रवास करीत आहोत. विद्यापीठाने चांगले मनुष्यबळ निर्माण केले पाहिजेत. भविष्यातील शिक्षण कसे देणार आहोत, याचाही विचार केला पाहिजे. माहिती देणे, शिक्षण देणे, नाविन्यपूर्ण पद्धत विकसित करणे, या पद्धतीने शिक्षण दिले पाहिजे. बहु विद्याशाखीय शिक्षणाच्या माध्यमातून जगासमोर असलेले प्रश्न सोडविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी हित, कर्मचारी हित, जपणे हे संस्थेचे महत्वाचे कार्य आहे. एनआयआरएफ मूल्यमापनात देशातील राज्य विद्यापीठामध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 46 वा क्रमांक आला आहे. यश सांघिक प्रयत्नामुळे प्राप्त झाले आहे. कोणतीही आपत्ती इष्ट आपत्तीत रुपांतर करता येते. सत्कारमूर्ती डॉ. वेदकुमार वेदालंकार यांचे अप्रकाशित साहित्य विद्यापीठाच्या वतीने प्रकाशित करण्याची ग्वाही, त्यांनी दिली. कार्याच्या माध्यमातुन प्रशासकीय आणि गुणवत्तेची शिस्त लावणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरु प्रा. डॉ. विजय फुलारी यांनी केले. सत्कारमूर्ती डॉ.वेदकुमार वेदालंकार यांनी त्यांची साहित्य संपदा ज्ञानेश्वरी, कुलगुरु प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र- कुलगुरु, प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे, व्यवस्थापन परिषद सदस्य बसवराज मंगरुळे, यांना भेट  दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम शिंदे आणि. डॉ. महेश्वर कळलावे यांनी केले. विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर यांनी आभार व्यक्त केले.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर 20 वा वर्धापन दिन सोहळ्यास उपपरिसरातील सर्व विभागप्रमुख,  प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top