धाराशिव (प्रतिनिधी)-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात आईचं झाड संकल्पनेेतुुन वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, कुलगुरु प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र- कुलगुरू प्रा. डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव प्रा. डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आईचं झाड संकल्पनेेतुुन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. 

विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या मातोश्री कै. सौ. पुष्कर्णी पुरुषोत्तम दिक्षित यांच्या 71 व्या जयंतीनिमित्त विद्यापीठ उपपरिसरातील विज्ञान विभाग व वसतीगृह परिसरात 71 रोपांचे वृक्षारोपण  करण्यात आले. पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण करणे महत्वाचे आहे. पाण्याचे संरक्षण, स्वच्छ हवा, मातीचे रक्षण आदि पर्यावरणासाठी आवश्यक घटक आहेत.  प्रतिमा पुजन करून वृक्षारोपण कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. संचालक प्रा. डॉ. प्रशांत दीक्षित, व्यवस्थापन परिषद माजी सदस्य संजय निंबाळकर, राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य देविदास पाठक, व्यंकटेश महाजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. प्रशांत चौधरी, शेषाद्री डांगे, डॉ. नितीन पडवळ, डॉ. संदीप देशमुख, डॉ. अतुल हुंबे, सहाय्यक कुलसचिव भगवान फड, कमवा व शिका योजना समन्वयक डॉ. गोविंद कोकणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल खोब्रागडे, डॉ. मेघश्याम पाटिल, जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. जितेंद्र कुलकर्णी, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. किशन हावळ, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, प्रा. सचिन बस्सैयै, डॉ. महेश्वर कळलावे, डॉ. सोनाली दीक्षित, कु. आरोही दीक्षित, नंदकिशोर मस्के, धनराज सोमवंशी, अण्णासाहेब बचुटे, महेश खंडागळे, शिवराज वाघमारे आणि विविध विभागातील विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

 
Top