तुळजापूर (प्रतिनिधी)- छञपती संभाजी महाराजा सह गढप्रेमी वरील गुन्हे मागे घेण्याची मागणी स्वराज्य संघटनेने केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विशाळगड प्रकरणी छञपती, युवराज संभाजीराजे छत्रपती प्रशासनाला मागील दिड वर्षापासून वारंवार सुचना देत होते. परंतू कसल्याही प्रकारची अतिक्रमण धारकावर कारवाई न झाल्याने युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी 01 जुलै 2024 रोजी आंदोलनाची हाक दिली. परंतू प्रशासनाने कुठलिच दखल घेतली नाही. त्यामुळे युवराज संभाजीराजे छत्रपती हे 14 जुलै 2024 रोजी विशाळगडावर गेले. आणी जी कांही घटना घडली त्याला सर्वस्वी जिल्हा प्रशासन जबाबदार असताना सर्व सामान्य शिवभक्तावर तसेच छत्रपती संभाजीराजे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. तरी तात्काळ शिवभक्तावरील तसेच युवराज संभाजीराजे छत्रपती व गडप्रेमीवरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे. अन्यथा राज्यभर तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वराज्य संघटना जिल्हा शाखा धाराशिव यांनी दिला. हे निवेदन जिल्हाध्यक्ष महेश गवळी, अजम सांळुके, हणमंतराव फंड, कुमार टोले, अविनाश सांळुके यांनी दिले आहे.