तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह परिसरात डेग्यु साथ पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषद अँक्शन मोडवर आली असुन सध्या सर्वञ डास निर्मुलनासाठी नाल्या वा गवतावर औषध फवारणी केली जात आहे. संपुर्ण  तुळजापूर शहरात औषध फवारानी साठी आठ दिवस लागण्याची शक्यता आहे.

सध्या तीन मशीन माध्यमातून सह कर्मचारी डास निर्मुर्लन साठी फवारणी करीत आहेत.पावसाने उघडीप दिल्यानंतर धुराडा व पावडर फवारणी  शहरभर केली  जाणार आहे. कारण धुराडा व पावडर फवारणी केली तर पावसाचा संततधारमुळे फवारणी धुवुन वाया जाते. त्यामुळे नंतर फवारणी करणार अशी माहीती नगरपरिषद स्वछता विभाग प्रमुख दत्ता सांळुके यांनी दिली. 


शहरात दोन, ग्रामीण भागात एक असे तीन डेग्यु रुण्ण

तुळजापूर  तालुक्यात 2जुलै ते 11जुलै याकालावधीत डेगु चिकनगुनिया  संशियत अशा तेरा रुग्णांचे रक्त तपासणी साठी सोलापूर ला  पाठवले असता त्यापैकी तीन रुग्णांचे रिपोर्ट डेगु पाँजीटीव्ह आले असुन यात शहरातील दोन व व ग्रामीण भागातील  ऐका महिलेचा समावेश आहे.

जिथे रुग्ण सापडले आहेत त्या भागात सर्वेक्षण करुन ज्यांना पाच दिवसापासून ताप  आहे अशा रुग्णांचे रक्ताचे नमुने घैवुन ते तपासणी साठी सोलापूर रक्ततपासणी प्रयोग  शाळेत पाठवले आहे 

रुग्ण सापडलेल्या ठिकाणी नगर परिषदेला फवारणी करण्याचा सुचना दिल्या असुन परिसर निर्जुतुकीकरण हँबेटींग  करण्यात येत आहे

तुळजापूर तालुक्यातीन 2जुलै ला 3जणांचे रक्त तपासणी स पाठवले होतै पैकी ऐक पाँजीटीव्ह 5जुलै 6सर्व निरंक 11जुलै ला 7पैकी ऐक पाँजीटीव्ह आले आहेत सध्या डेगु सदृश्य रुग्ण सापडत असुन विशेषता लहान मुलांन मध्ये डेगु सदृश्य साथ रुग्ण आढळत आहेत.


तालुक्यात वातावरणातील  बदल पावसाची सततची रिपरिप, जागोजागी साचलेल्या पाण्यात होणारी डास उत्पत्ती, दूषित पाणी यासह इतर कारणांनी सध्या रुग्णालयात ताप  सर्दी खोकला  रुग्णांची संख्या  वाढली असुन यात बाल रुग्णांची संख्या  लक्षणीय आहे. तसेच  गँर्ट्रो डेग्युसदृश्य आजारांच्या रुग्णांन येत आहेत. उपजिल्हारुग्णालयात जवळपास अडीच रुग्ण ओपीडीत उपचारास येत असुन यातील ताप खोकला सर्दी रुग्णांची संख्या  चाळीस ते पन्नास  रुग्णांचा आसपास आहे. घराघरांत आबालवृद्ध सर्दी, खोकल्याने हैराण आहेत. अचानक ताप, डोकेदुखी, जुलाबाचे रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता वेळीच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घ्यावे, असे आवाहन उपजिल्हारुग्णालय वैद्यकीय  अधिकारी डाँ. दिपक चोरमोले यांनी केले आहे.



राकाँ शरद पवार  गट निवेदन दखल 

राष्ट्रवादीकाँग्रेस शरदपवारगट  तर्फ  शहरांमध्ये डासांचे प्रमाण वाढलेला आहे त्यामुळे नागरिकांना डेंगूची लागण होत आहे शहरामध्ये अस्वच्छता व  गटारी साफ करण्याबाबत निवेदन  दिले.  हे निवेदन  तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील शहराध्यक्ष अमर चोपदार मकसद शेख रुबाब भाईपठाण तोफिक शेख प्रभारी युवक तालुकाध्यक्ष शरद जगदाळे वाहिद भाई शेख राम थोरात  समाधान धाकतोडे  यांनी दिले होते.याची दखल घेऊन शहरात फवारणीस आरंभ केला आहे.

 
Top