धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात दि. 23 जुलै 2024 रोजी लोकमान्य टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख बोलत होते.
टिळक हे स्वराज्याचे पहिले आणि प्रबळ पुरस्कर्ते होते. तसेच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते होते. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!" या त्यांच्या घोषणेसाठी ते ओळखले जातात.
असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, टिळकांचे बिपिन चंद्र पाल, लाला लजपत राय, अरबिंदो घोष, व्ही.ओ. चिदंबरम पिल्लई आणि मुहम्मद अली जिना यांच्यासह अनेक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांशी घनिष्ट संबंध होते. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा .डॉ .केशव क्षीरसागर, प्रा . माधव उगिले आदींसह सर्व गुरुदेव कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.