धाराशिव (प्रतिनिधी)-   संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील महिला, शेतकरी, शेतमजूर यांच्या मागण्या तात्काळ सोडविण्यात यावेत, याबाबत वेळोवेळी शासनाकडे मागणी केली आहे. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे सोमवारी (दि.8) सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयसमोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, सन 2023 मधील शेतकयांचे नगदी पीक सोयाबीन कमी पावसामुळे हातचे गेले असून रब्बी हंगामातील हरभरा पिकाला एकरी अर्धा ते एक क्विंटल उतार मिळाला. शेतीला कमी पावसामुळे जिल्ह्यातील सामान्य माणुस, जनावरे यांची पाण्यामुळे दैनीय अवस्था झाली. त्यातच पीक विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम अदा केली व जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील 51 टक्के नुकसान झाल्याचे जाहीर केले. त्याप्रमाणे कंपीनने 1 लाख 92 हजार शेतकयांनी ऑनलाईन नुकसान भरपाई मागीतली त्यापैकी 37 हजार शेतकयांना तुटपूंजा पीक विमा मिळाला. त्यानंतर राहिलेल्या शेतकयांना मंजूर झालेला विमा आजपर्यंत मिळालेला नाही. मिटींग होणार आहे, मंत्रालयात बैठक आहे, केंद्र सरकारने पत्र देऊन थांबविले आहे, अशी वारंवार बैठका, चर्चासत्र घेवून हा विषय अजुनपर्यंत मार्गी लागलेला नाही. विम्याचे पैस ताबडतोब शेतकयांच्या खात्यावर वाटप करावे,  जिल्ह्यातील तीन तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला, परंतू दुष्काळी अनुदान मात्र 50 टक्केदेखील वाटप झाले नाही ते तात्काळ वाटप करावे.

शेतकयाचे संपूर्ण पीक कर्ज शासनाने माफ करावे. तसेच ज्या बँका शेतकयांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. गाईच्या दुधाला 40 तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये लिटरप्रमाणे भाव मिळावा व दुधासाठी एमएसपी कायदा करावा. तसेच दुध उत्पादकांना 5 रुपयाचे अनुदान देण्याची घोषणा केली. परंतू त्यातील जाचक अटी व शर्थी रद्द करुन दुध उत्पादकांना फेब्रुवारीपासून आजपर्यंत 5 रुपयाचे अनुदान द्यावे.

जिल्ह्यात मार्च, एप्रिल व मे मध्ये पडलेल्या अवकाळी पावसाची नुकसान भरपाई शेतकयांना मिळावी. जिल्ह्यातील शेतकरी व सामान्य मानसाच्या हजारो एकर जमीनी वर्ग 1 मधून वर्ग 2 मध्ये बदल केल्या. त्यापूर्वी प्रमाणे वर्ग 1 मध्ये कराव्यात. टेंभूर्णी लातूर चौपदरीकरणाचे काम त्वरीत चालु करुन जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील रस्त्याची कामे ताबडतोब चांगल्या पद्धतीने सुरु करावीत, आदी मागण्यांची वेळोवेळी शासनाकडे मागणी करुनही दखल न घेतल्यामुळे सोमवारी (दि.8) सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा निवेदनात जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर यांनी दिला आहे.

 
Top