परंडा (प्रतिनिधी)- आज दि. 12 जुलै रोजी श्री संत भगवानबाबा पालखी सोहळ्याचे आगमन कल्याणसागर विद्यालय, परंडा येथे झाले. यावेळी भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करून दिंडीचे सहपरिवार दर्शन घेतले. याप्रसंगी सर्व वारकरी व पालखी सोहळ्यातील सदस्यांना कल्याणसागर समुहाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिंडीतील सर्व वारकऱ्यांची मोफत तपासणी करण्यात आली.

 
Top