धाराशिव (प्रतिनिधी) -आदिवासी पारधी महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सुनील काळे यांना जीवगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मुंबईतील आझाद मैदान जवळील पत्रकार भवन हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब साळुंखे, प्रदेश महासचिव राणा सोनवणे, आदिवासी पारधी महासंघ यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र आदिवासी महासंघाचे सर्व जिल्हाध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. धाराशिव जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या प्रगतीसाठी सुनील काळे हे संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे सतत पाठपुरावा करून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.

 
Top