ढोकी (प्रतिनिधी)-जिल्हा परिषद धाराशिवचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुगांव ता.धाराशिव येथे नंदकुमार भुतेकर यांच्यावतीने शाळेतील 168 विद्यार्थ्यांना 200 पानी, अशा प्रत्येकी 2 यांप्रमाणे वह्यांचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. प्रथमत: स्वामी विवेकानंद यांच्या पु्‌‍ण्यतिथीनिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रमोद अनपट यांनी केले. शाळेतील शिक्षक सुलभकुमार भगत व नामदेव डुकरे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.या कार्यक्रमामध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत   

तेरणानगर बीटच्या विस्ताराधिकारी किशोरी जोशी यांच्या प्रेरणेतून उत्तुंग यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी अभय अंकुश हाजगुडे व शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी कुणाल धनाजी गडकर, आर्या अमोल वैद्य,पृथ्वीराज राहुल हाजगुडे, समर्थ दत्तात्रय भुतेकर, आदित्य रमेश शेंडगे या सर्व विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षक तथा वर्गशिक्षक शिवदास चौगुले, तसेच विषय शिक्षक सुलभकुमार भगत,अमोल वैद्य व शाळेतील सहकारी शिक्षक दत्तात्रय पडवळ, बाहुबली नवले,नवनाथ बचाटे,नामदेव डुकरे व मुख्याध्यापक प्रमोद अनपट यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून तडवळे केंद्राचे केंद्रप्रमुख जगदिश जाकते उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे किशोर शेंडगे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर भुतेकर उपस्थित होते. यावेळी दिलीप शेंडगे, पत्रकार शशिकांत भुतेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी बाबूराव भोरे,शहाजी डोंगरे,अमर भुतेकर,दयानंद शिंदे,दिपक गडकर, सदाशिव भुतेकर, अंकुश हाजगुडे हे शिक्षणप्रेमी नागरिक आवर्जुन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्तात्रय पडवळ यांनी केले. तर उपस्थितांचे आभार शिवदास चौगुले यांनी मानले.

 
Top