कळंब (प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या वतीने खात्यांतर्गत बढती परीक्षा 3 मार्च 2024 रोजी घेण्यात आली होती या परीक्षेत वरिष्ठ लिपिक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक व वाहतूक नियंत्रण या पदाच्या खात्याअंतर्गत बढती परीक्षेत कळं आगारातून 29 वाहका पैकी 25 वाहक वाहतूक नियंत्रक झाले तर तीन चालकांमधून दोन चालक सहाय्यक वाहतूक निरीक्षक तर 7 लिपिका मधून 4 लिपिक वरिष्ठ लिपिक म्हणून बढती झाल्याचा निकाल 16 जुलै रोजी महामंडळाने जाहीर केला या बढती परीक्षेमध्ये कळंब आगारातील वाहतूक नियत्रक म्हणून सुनील शिंदे ,अलीम बागवान (शेख) अनिस पठाण,बाबासाहेब जाधवर, वैजिनाथ पवार , सुनील गुरव,सतीश सारुख ,चंद्रकांत काळे , गणेश लवटे ,सुभाष भोसले, बाजीराव बांगर, दत्तात्रय वाघमारे,उत्रेश्वर सोनवणे, महादेव झांबरे,हनुमंत मुंडे, बबन पवार, महादेव लाटे, संतोष जोशी, उमाकांत गायकवाड, रणजित मुंडे, शिवाजी राठोड, संघरक्षित गायकवाड, नंदू चव्हाण , महेश थोरबोले व  महिला वाहक  सौ अश्विनी गालफाडे हे वाहक पदावरून परीक्षा पास होऊन वाहतूक नियत्रक्‌‍ पदावर बढती झाली आहे. 

तर लिपिक मध्ये सौ  प्रियांका शिंदे (कांबळे), रामलिंग जाधवर, नितीन गायकवाड, संध्या कुमठेकर यांची वरिष्ठ लिपिक पदावर बढती मिळाली आहे. चालक पदावरून रतन लोहार, वसंत गंभिरे हे सहाय्यक वाहतूक निरीक्षक म्हणून यांना बढती मिळाली आहे .या बढती बद्दल कळंब चे आगार प्रमुख संतोष कोष्टी; सहाय्यक वाहतूक अधीक्षक बालाजी मुळे,कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, वाहतूक निरीक्षक अनंत कवडे, वाहतूक साह्यक वाहतुकनिरीक्षक अभिजित धकतोडे, वाहतूक नियंत्रक सुशील हूंबे, नामदेव जगताप,चेतन गोसावी, कल्याण कुंभार, शिवाजी बांगर, विलास जाधव, सायास खराटे, यांनी परीक्षेत पास झालेल्या वाहक चालक व लिपिक यांचे अभिनंदन करून कौतुक केले. 

 
Top