धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजापूर येथील युवा लेखक आणि कवी देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी त्यांच्या घरी जावून कुटूंबासह सत्कार केला.

 यावेळी त्यांचा कुटुंबातील आई-वडील पत्नी यांचाही सत्कार केला याप्रसंगी तुळजापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तुळशीदास साखरे, संजय देवकते, अनिल जाधव, गणेश लोंढे, देविदास सौदागर यांचे वडील महादेव सौदागर, आई बालिका सौदागर, पत्नी वर्षा सौदागर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना संजय पाटील दुधगावकर म्हणाले की, काळजात लेण्या कोरताना हा कवितासंग्रह त्यांचा यापूर्वीचा कवितासंग्रह. शिलाई काम करता करता आपल्या मनातल्या सुखदु:खाच्या गोष्टी त्यांनी त्या कवितेत मांडलेल्या होत्या. अत्यंत उमदा असा कवी पुढे कादंबरीकडे वळला आणि त्यांनी उसवण ही कादंबरी लिहिली. त्या कादंबरीला आता साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. ही खूप अभिमानास्पद आणि अभिनंदनीय गोष्ट आहे. मराठवाड्यासाठी आणखीन एक शिरपेच रोवला गेला आहे. वीरा राठोड, रवी कोरडे यांच्यानंतर मराठवाड्याच्या वाट्याला आलेला हा तिसरा युवा साहित्य अकादमी पुरस्कार आहे.

 
Top