धाराशिव (प्रतिनिधी)- खून केल्याच्या आरोपातून सर्व तिघांची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय धाराशिव यांनी दि. 18 जून रोजी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

नळदुर्ग येथे दि. 21 एप्रिल 2024 रोजी फिर्यादी राघर्वेद्र दासकर व त्यांचा पुतण्या बाबा उर्फ आनंद दासकर हे दोघे येडोळा शिवारातील शेतात गेले. तेव्हा गट नंबर 22 मध्ये किसान दासकर यांच्या शेतामध्ये पानलोटचे बंधाऱ्याचे पोकलेनच्या सहाय्याने काम चालू होते. सकाळी 9.30 वा. सुमारास फिर्यादी व आनंद याने आरोपी बबलू उर्फ शहाजी दासकर, अभिषेक पासमेल व कुनाल पासमेल यांना म्हणाला आम्ही गट नंबर 22 व 23 मध्ये दोन महिन्यापूर्वी सरकारी मोजणी करून घेवून दगडावर चुना टाकून हद्द कायम केली आहे. तरी तुम्ही आमचे शेतात पाणलोटचे बांध घालू नका. असे म्हणून काम करणाऱ्या पोकलेन चालकाला काम थांबवण्यास सांगितले. काम थांबलेले पाहून आरोपी बबलू उर्फ शहाजी दासकर, अभिषेक पासमेल व कुनाल पासमेल हे फिर्यादी व आनंद जवळ आले व तुम्ही आमचे काम का थांबवले असे म्हणून शिवीगाळ करून आरोपी बबलू उर्फ शहाजी दासकर याने आनंद यांच्या सोबत झटापट सुरू केली. फिर्यादी राघवेंद्र व अशोक दासकर यांनी त्या दोघांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी अभिषेक व कुनाल हे दोघे तेथे आले आणि त्या तिघांनी फिर्यादी राघवेंद्र व आनंद यास मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी शहाजी हा त्याच्या भाच्यास म्हणाला की, हा आनंद लय माजला आहे. तो नेहमीच आपल्याला त्रास देतो आता त्याचा कायमचा काटाच काढू असे म्हणाला व हातात दगड घेवून मागे लागला. मागून आनंदच्या डोक्यात जोरात दगड फेकून मारला. तो दगड आनंदच्या डोक्यात लागल्याने तो खाली पडला. त्यावेळी तेथे शहाजीच्या पाठीमागून आरोपी अभिषेक व कुनाल असे दोघेजण आले व त्यांनी देखील आनंद यास दगडाने मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी राघवेंद्र आनंद खाली पडलेला पाहून त्याकडे पळत गेला असता आरोपी तेथून पळून गेले. 

राघवेंद्र ने पाहिले की, आनंद हा गुडघ्यावर खाली पडला होता. राघवेंद्र दासकर व अजय दासकर याने आनंद यास प्रथम नळदुर्ग येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेहले. परंतु त्याची परस्थिती पाहून त्यास सोलापूर येथे घेवून जाण्यास सांगितले. तेव्हा सोलपूर येथे पोहचले असता डॉक्टारांनी आनंद हा मयत झाल्याचे सांगितले. पोलिसांनी प्रेताचा पंचनामा केला. डॉक्टरांनी पोस्टमाटम केले. फिर्यादी राघवेंद्र याने नळदुर्ग पोलिस स्टेशन येथे आरोपी बबलू उर्फ शहाजी किसन दासकर, अभि उर्फ अभिषेक प्रभाकर पासमेल व कुनाल प्रभाकर पासमेल यांच्या विरूध्द तक्रार दिली. त्यावरून नळदुर्ग पोलिस स्टेशन येथे गु.र.क्र. 82/2018 हा कलम 302, 504, 34 भादवि प्रमाणे नोंद झाला. आरोपीच्या बचावामध्ये जेष्ठ विधीज्ञ ॲड. विजयकुमार शिंदे यांनी साक्षीदाराचा उलट तपास केला. सुनावणीअंती सदर प्रकरणात सरकारपक्ष व आरोपी तर्फे बचाव पक्षाचा अंतिम युक्तीवाद होवून ॲड. विजयकुमार शिंदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून सबख पुराव्या अभावी सर्व तिन्ही आरोपींची धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती अंजू शेंडे यांनी 18 जून 2024 रोजी निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणात ॲड. विजयकुमार शिंदे यांना ॲड. विश्वजीत शिंदे, ॲड. अजित राठोड, ॲड. भाग्यश्री रणखांब यांनी सहकार्य केले. 2018 साली सदर घटना सर्वत्र गाजली होती. त्यामुळे सदर केसकडे जिल्ह्यासह अनेक भागातील लोकांचे लक्ष लागून होते. 

 
Top