धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील सहकार भारतीच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ वर्षा लक्ष्मीकांत कस्तुरकर यांची नुकतीच इफको या आशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थेवर संचालिका म्हणून निवड झाली आहे .या निमित्ताने त्यांचा धाराशिव येथे जाहीर सत्कार 15 जून रोजी आयोजित केला आहे. यावेळी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे तसेच सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन प्रमुख संजय पाचपोर आणि अखिल भारतीय राष्ट्रीय सेवा भारतीच्या सचिव श्रीमती चंद्रिका भाभी चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ होत आहे.

.सहकार भारती ही सहकार क्षेत्रात काम करणारी अखिल भारतीय संघटना आहे. गावोगावी असणाऱ्या सहकारी संस्था, त्यांचे पदाधिकारी, सभासद या सर्वांचे संघटन करून सहकार क्षेत्रात रचनात्मक कार्य करणे, सर्व घटकांचे प्रशिक्षण करणे, समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करणे. अशा विविध स्तरांवर देशभरातील 700 जिल्ह्यांमधे सहकार भारतीचे काम चालू आहे.

नुकत्याच   IFFCO (Indian Farmers Fertilisers Coop Society) इफ्को या अशिया खंडातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. आपल्या धाराशिव जिल्ह्याला अभिमान वाटावा अशी ही निवडणूक झाली. डॉ. सौ. वर्षा लक्ष्मीचंद कस्तूरकर जिल्हा महिला अध्यक्ष सहकार भारती या इफ्को या संस्थेवर संचालिका म्हणून निवडून आल्या आहेत.

आपण धाराशिव सहकार भारतीच्या वतीने त्यांचा 15 जून रोजी शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता स्वयंवर मंगल कार्यालय,जिजाऊ चौक बार्शी नाका धाराशिव येथे नागरी सत्कार करण्याचे योजले आहे. या निमित्ताने सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे स्नेहमिलन आयोजित केले आहे.तरी या कार्यक्रमासाठी सहकार क्षेत्रातील जाणकार तसेच सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या आणि सहकार क्षेत्राची आवड असलेल्या सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन धाराशिव जिल्हा सहकार भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top