धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्व सुविधा देऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाणार आहे.  गुणवंत्तेत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे प्रतिपादन मुख्यकार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आळणी ता.धाराशिव येथे 2024-25 नुतन शैक्षणिक सत्रास प्रवेश उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. 

प्रथम नवागत बालकांचे स्वागत सजवलेल्या बैलगाडीतून व ट्रॅक्टर मधून बँड पथकाच्या तालात,विद्यार्थ्यांनी लेझीम खेळून सबंध गावातून  अतिशय उत्साहात प्रभात फेरी काढण्यात आली. नवीन पहिलीत प्रवेश झालेल्या मुलांचे स्वागत जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष,शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी अशोक पाटील, शिक्षण निरीक्षक सराफ मुख्याध्यापक बशीर तांबोळी यांच्या वतीने करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी केंद्र प्रमुख निलेश नागले, शेषराव राठोड, आळणी गावचे सरपंच प्रमोद  वीर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजयकुमार नांदे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष श्याम  लावंड, ग्रामपंचायत सदस्य विनोद  लावंड, अक्षय कदम, वर्षा डोंगरे, सुनिता कराड, मंजुषा नरवटे, सुलक्षणा ढगे, क्रांती मते, सत्यशीला म्हेत्रे, राधाबाई वीर, हनुमंत माने आदीसह शिक्षक, शिक्षिका, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top