धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील शिंगोली विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या पोलीस गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या सभासदांची बैठक कालिका माता मंदिर सभागृहामध्ये सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक पी.टी. विसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीमध्ये पोलीस गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीची मोजणी करणे, अंतर्गत रस्ते व प्लॉटची मार्किंग करुन हद्द खुणा निश्चित करणे आदींसह विविध विकास कामांचे ठराव घेण्यात आले. या गृहनिर्माण संस्थेचे 150 सभासद आहेत. ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीस सेवानिवृत्त कार्यालय अधीक्षक डी.एम. राऊत, पोकॉ रत्नदीप भोजगुडे, सेवानिवृत्त पोउपनि रवींद्र खटके, पी.आर. मोरे, सलीम पठाण, ए.बी. कांबळे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे सूत्रसंचालन डी.एम. राऊत यांनी तर उपस्थितांचे आभार सुरेश खटके यांनी मानले.


 
Top