धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात दिनांक 16 जून 2024 रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.जयसिंगराव  देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते . याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख बोलत होते. विद्यार्थी हे महाविद्यालयाचे दैवत असतात विद्यार्थ्यांशिवाय महाविद्यालयाचा विकास करणे अशक्य आहे असे ते यावेळी म्हणाले.

याप्रसंगी सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी धाराशिव येथील सुप्रसिद्ध डॉ.अभय शहापूरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. शहापूरकर म्हणाले की, महाविद्यालयाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलला आहे. प्राचार्य डॉ. देशमुख यांच्या काळात अनेक शैक्षणिक कोर्स व संशोधन केंद्र आणि पायाभूत सुविधा  सुरू करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय झालेली आहे यामुळे मोठे समाधान वाटते. याप्रसंगी माजी विद्यार्थी  ॲड खंडेराव चौरे उपस्थित होते. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. डॉ. एस. एस.फुलसागर व सह-समन्वयक प्रा. डॉ.संदीप देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. केशव क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा.माधव उगिले यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दत्तात्रय साखरे यांनी केले.


 
Top