धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुल गडपाटी, धाराशिव, येथील आर.पी. औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये संस्थेचे विश्वस्त डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून व महाराष्ट्र शासन सामाजिक वनीकरण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षोत्सव साजरा करण्यात आला.

या वृक्षोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख गाझी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, लोणेरे, सोलापूर विभागाचे प्रमुख डॉ. वायकर  यांची उपस्थिती लाभली. या वृक्षोत्सवात  मध्ये प्रामुख्याने कडुनिंब, मोहगणी, पिंपळ, बोर, वड, बोर, आंबा या  वेगवेगळ्या देशी प्रजातीची वृक्षारोपण करण्यात आले. या  प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गाझी शेख यांनी जागतिक हवामान बदला मुळे सजीव सृष्टीवर होत असलेले परिणाम तसेच वृक्षारोपण ही काळाची गरज कशी आहे याचे महत्त्व विषद केले, त्याच बरोबर डॉ.वायकर  यांनी जागतिक स्तरावर होणारी दुष्काळजन्य परिस्थिती, अवकाळी पावसामुळे होणारे अन्नदात्याचे नुकसान तसेच निसर्गाचा बिघडलेला समतोल व परिणामी जागतिक स्तरावर ढासळलेला पर्यावरण आणि वसुंधरेचा समतोल या विषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. गणेश मते यांनी काम पाहिले. या वृक्षारोपण प्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापक इतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top