भूम (प्रतिनिधी)-भुमीपूत्र डॉ .राहुल भिमराव घुले यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.18 जून 2024 रोजी मौजे आनंदवाडी ता. भूम येथे गुरुवर्य भिमराव बाबुराव घुले यांच्या हस्ते 69 जेष्ठ नागरिकांना मोफत आधाराच्या काठीचे वाटप करण्यात आले. गुरुवर्य श्री भिमराव घुले सरांच्या हस्ते ग्रामदैवत श्री दत्त महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून काठी वाटप करण्यात आले.यावेळी ग्रामस्थांच्यावतीने भिमराव घुले सरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महादेव वनवे, भगवान वनवे, दशरथ वनवे, श्रीराम चौरे यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमांबद्दल आनंदवाडी ग्रामस्थांनी डॉ.राहुल घुले यांचे आभार मानले.

 
Top