परंडा (प्रतिनिधी) - तालुक्यातील कुक्कडगाव येथे बुअलिशाह कलंदर उर्स निमित्ताने शनिवार दि.18 मे रोजी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या निकाली कुस्तीच्या जंगी मैदानात भोंजा येथील पै. नेताजी हंबीरराव भांदुर्गे यांनी रोख रक्कम 20 हजार व 7 किलोचा गदा मिळविल्याने भोंजा हवेलीत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. ग्रामस्थांनी  हनुमान मंदीरात भांदुर्गे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.     

यावेळी भोंजा गावचे उपसरपंच वस्ताद शिवाजी घाडगे, मा सरपंच नवनाथ मोरे, पै हंबीरराव भांदुर्गे, विलास नेटके, चेअरमन अर्जुन भांदुर्गे, मुख्याध्यापक बाळासाहेब घोगरे, सुब्राव मोरे, गणेश नेटके, पै अशोक सुतार, पै जालिंदर मोरे, उद्योजक गणेश घाडगे, उद्योजक शरद कोळी, बागायतदार पप्पू मोरे, सेवक मारूती भांदुर्गे, पै. उमाजी भांदुर्गे, दिप्तेश कांबीलकर, बागायतदार अमोल मोरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top