तुळजापूर  -  तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे ऊन्हाळी सुट्या, लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर रविवारी  श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील  भाविकांची तुडुंब गर्दी झाली होती. रविवारी तुळजापूर शहरासह मंदिर परिसर भाविकांनी गजबजुन गेला होता 


रविवारी पहाटे ,एक वाजता चरणतीर्थ पूजा होवुन धर्म  दर्शनास प्रारंभ झाला. सुमारे दीड लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. आज धर्मदर्शन, मुखदर्शन व  अभिषेकदर्शन सशुल्क दर्शन रांगा भाविकांनी भरभरुन वाहिल्या.  श्री तुळजाभवानी दर्शनानंतर भाविकांची बाजारपेठेत प्रसाद, पूजा साहित्य, मूर्ती, फोटो खरेदीसाठी गर्दी करीत असल्यामुळे बाजारपेठ फुलुन गेली होती. भाविक मोठ्या संखेने खाजगी वाहनाने आल्यामुळे सर्व वाहनतळे तसेच महामार्ग व शहरातील रस्त्यावर सर्वत्र वाहनांची तुडुंब गर्दी दिसत होती. 


 
Top