परंडा (प्रतिनिधी) - उमरगा येथील उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी मौलाना व मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मुस्लिम समाजाच्या वतीने येथील पोलीस निरिक्षक विनोद इज्जपवर व तहसिलदार घनश्याम आडसूळ यांना गुरुवार दि.9 रोजी निवेदन देऊन माजी खासदार गायकवाड यांच्याविरोधात योग्यती कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

उमरगा येथे दि.5 रविवार रोजी उस्मानाबाद लोकसभा महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) गटाचे उमेदवार अर्चना पाटील यांच्या जाहिर प्रचार सभेत माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी आक्षेपार्ह बेताल असे वक्तव्य करून मुसिलम समाजाच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याने मौलाना व मुस्लिम समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तसेच गायकवाड यांनी आदर्श आचारसंहीतेची सर्व नियमावली माहिती असताना देखील त्यांनी त्याचे उल्लंघन केले आहे.तरी गायवाड यांची सखोल चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली आहे.दिलेल्या निवेदनावार मौलाना व मुस्लिम समाजातील शेकडोच्या वर स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top