कळंब / प्रतिनिधी

धाराशिव येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवावर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या राठोड नामक जातीयवादी पोलीस अधिकाऱ्याला  तात्काळ बडतर्फ करावे अन्यथा कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाज कळंब तालुक्याच्या वतीने ,गुरुवार दिनांक 16 मे रोजी लाक्षणिक उपोषण* करून पुढील दोन दिवसात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. सदर मागणीची तात्काळ दखल न घेतल्यास होणाऱ्या पुढील आंदोलनास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल , असा इशारा सकल मराठा समाज कळंब तालुका यांच्या वतीने देण्यात आला. या वेळी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, या वेळी मोठ्या प्रमाणावर सकल मराठा  समाज उपस्थित होते.

 
Top