तुळजापूर - तालुक्यातील तीर्थक्षेत्र यमाईदेवी मंदीराकडे जाणाऱ्या भातंब्री ते रायखेल रस्त्यावरील काम निवडणुकीच्या धामधुमीत सांयकाळी उरकल्याने या रस्ता कामाच्या दर्जा बाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण झाले असुन या रस्ता कामाच्या दर्जाची गुणवता तपासण्याची मागणी येमाईदेवी भक्तांन सह ग्रामस्थांन कडुन केली जात आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की तुळजापूर तीर्थक्षेत्र  अक्कलकोट रस्त्यावर भातंब्रा  गाव असुन येथुन जवळच रायखेल येथे  येमाई देविचे मंदिर आहे. येमाई देविच्या दर्शनासाठी वर्षभर लाखोचा संख्येने भाविक येतात. सध्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयामार्फत भातंब्रा ते रायखेल डांबरी  रस्ता काम चालु आहे. ऐन निवडणुक काळात सायंकाळी काम केले जात आहे. यात डांबर कमी वापरले जात आहे. तसेच हे काम अंदाजपञकाप्रमाणे होत नसल्याचे दिसुन येत आहे, निकृष्ट दर्जाचे काम केल्याने हा रस्ता लवकर खराब होवुन याचा फटका येमाई देवीभक्तांसह भाविकांना बसणार आहे. या कामाची तपासणी करुन दोषी आढळल्यास संंबधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 
Top