धाराशिव (प्रतिनिधी)-गुटखा वाहतूक करणाऱ्या 2 आरोपीला वाहतुक शाखेच्या पोलिसांनी अटक करून गजाआड केले आहे. एकूण 24 लाख 71 हजार रूपयांचा माल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वाहतुक शाखेचे पोलीस धाराशिव ते येडशी रोडवर मोटर वाहन केसेस करणे कामी शासकीय वाहनाने पेट्रोलिंग करत होते. दरम्यान पोलीस पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सोलापूर ते धुळे हायवे रोडवर एक अशोक लेलॅड कंपनीचे (बडा दोस्त) मॉडेलचे वाहन क्र एमएच 44 यु 2405 या मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटख्याची वाहतुक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने सदर वाहनास थांबण्याचा इशारा केला. वाहन चालकाने वाहन न थांबवता पुढे निघून गेला. पथकाने वाहन थांबवून चेक केले असता वाहनामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा दिसून आला. 

पोलीस पथकाने वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव  शेख रेहान शेख रहीम, रा. मोमीनपुरा बीड),  शेख अफरोज रा. बार्शी नाका  बीड असे सागिंतले. तसेच पथकाने त्यांचे ताब्यातील नमुद वाहनातुन हिरा पान मसाला 26 पोते, बाबा गुटखा 20 पोते, हिरा गुटखा असलेला पान मसाला 50 पोते,  रॉयल जर्दा 220, 20 पोते, रॉयल 717 तंबाखु 13 पोते, रॉयल 220 तंबाखु 25 पोते, असे पोते, बॅग, पॉकेट  सह अशोक लेलॅड कंपनीचे वाहन क्र एमएच 44 यु 2405 वाहन, एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी  क्र एमएच 01 बीटी 6144 व मोबाईल फोन असा एकुण 24 लाख 71 हजार 320 रूपये किंमतीचा माल मिळून आला. मिळून आलेली वाहने व माल जप्त करुन माला सह आरोपी नईम रहीम शेख, वय 40 वर्षे, रा. मोमीनपुरा बीड, हुसेन अहमद शेख वय 30 वर्षे, रा. मोहम्मदीया  कॉलनी बीड ता. जि. बीड यांना ताब्यात घेवून आरोपी विरुध्द पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक शेख, पोलीस उप निरीक्षक राजेंद्रसिंग ठाकुर, पोलीस नाईक शेळके, पोलीस अमंलदार कोळी, चालक कोळगे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 
Top