धाराशिव  (प्रतिनिधी)- येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इन्स्टिट्यूट इनोवेशन सेल अंतर्गत  मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन सेल ऑल इंडिया कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्यावतीने बजेट देऊन पुरस्कृत केलेला एक दिवसीय इंनोवेशन इम्पॅक्ट लेक्चर सिरीज अंतर्गत वर्कशॉपचे आयोजन केले होते.

या वर्कशॉपसाठी डीएसटी मंडळ सोलापूरच्या फार्मसी कॉलेजचे डॉ. श्रीशैल्य भुरभुरे, एमआयटीएडीटी युनिव्हर्सिटी पुणेचे संचालक डॉ. सुरज भोयर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, कार्यशाळा कनन्व्हेंनर डॉ. सुशीलकुमार होळंबे, कार्यशाळा समन्वयक डॉ. प्रीती माने यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी  डॉ. श्रीशैल्य भुरभुरे यांनी कपिला फंड या विषयी माहिती देऊन, प्रॉपर्टी राईट म्हणजेच अर्थात बौद्धिक संपदा हक्क म्हणजे काय याचे विस्तृत विवेचन करून बौद्धिक संपदा हक्क व त्याचे असलेले प्रकार तसेच बौद्धिक हक्क, पेटंट रजिस्टर करताना  आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची माहिती दिली. तसेच पेटंट कायदा सुरुवातीस अमलात आल्यानंतर त्यामध्ये कसा कसा बदल होत गेला याविषयी विस्तृत अशी माहिती दिली. या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये एमआयटी एडीटी यूनिवर्सिटी पुणे चे संचालक डॉ. सुरज भोईर यांनी  इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट अँड आयपी मॅनेजमेंट फॉर स्टार्ट अप  यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी विशेष जॉग्रफिकल पेटंट वर भर दिला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले की,  अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनेक कौशल्य पूर्ण प्रोजेक्ट सादर केले आहेत. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक कार, मानवी रोबोट, इलेक्ट्रिक स्कूटर, फ्लोवर क्लिनिंग मशीन तसेच  आर एफ आय डी  या तंत्रज्ञानाने उपस्थिती ठेवणे , कोरोना काळामध्ये  कोरोना रुग्ण डिटेक्ट करणे असे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट केलेले आहेत. या कार्यशाळेमध्ये उपस्थित असलेल्या 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी दोन्ही सत्र पूर्ण केल्यानंतर त्यांना महाविद्यालयाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. या कार्यशाळेच्या समन्वयक डॉ. प्रीती माने यांनी सर्व उपस्थित तज्ञ व उपस्थिताचे आभार मानले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रा. आर. डी. गुरव, प्रा. आर. बी. ननावरे, प्रा.अमृता पिंपळे, प्रा. डी. बी. भक्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top