धाराशिव (प्रतिनिधी)-तालुक्यातील अनसुर्डा येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपात प्रवेश केला. उपस्थित कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी आमदार पाटील यांना दिला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनसुर्डा शाखाप्रमुख भैरवनाथ माने यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर व आमदार राणाजगजितसिंह पाटील कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये विष्णू माने, अंकुश पवार, गणेश जाधव, दिनेश डोके, मुशीर शेख, महेश बालाजी माने, हनुमंत माने, विशाल कसबे,अरुण गायकवाड, रितेश माने, भैरवनाथ माने, विठ्ठल माने, बन्सीलाल माने, छत्रगुण हुंबे, काका पाटील, किशोर माने, ज्ञानेश्वर माने, काकासाहेब माने, रुत्विक माने, पमु माने, चांगदेव माने, अभिजित माने, हनुमंत माने, ईश्वर माने, गणेश माने, गोरोबा माने, बालाजी पवार, काका पवार, महादेव माने, रामचंद्र माने, ज्ञानेश्वर वांकर, आप्पासाहेब माने, प्रवीण वामन माने, शिवप्रसाद माने, चांगदेव माने, रफिक शेख, विशाल उत्तम माने, सुभाष माने, मच्छिंद्र माने, मोहन माने, दत्ता पवार आदींचा समावेश आहे. कार्यकर्त्यांच्या प्रवेश कार्यक्रमप्रसंगी भाजपाचे राजाराम कोळगे, उपसरपंच अनंत बोंदर, दादासाहेब पवार, श्रीहरी माने, पांडुरंग माने, बेंबळीचे सरपंच नितीन इंगळे यांची उपस्थिती होती.


 
Top