उमरगा (प्रतिनिधी)-उमरगा तालुक्यातील तुरोरी, कराळी परिसरातील निसर्गरम्य अशा अचलबेट देवस्थानचा धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून विकास करू. राज्यातील प्रमुख देवस्थानच्या यादीमध्ये अचलबेटचे देवस्थान येण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी दिले.

मंगळवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उमरगा तालुक्यातील तुरोरी, कराळी परिसरातील निसर्गरम्य अचलबेट देवस्थान येथे उमेदवार अर्चनाताई पाटील यांनी दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, देशाला विकासाच्या नव्या शिखरावर नेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य जगाला आदर्शवत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची निवड करण्यासाठी घड्याळाला साथ द्या, असे आवाहन केले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले, अभय चालुक्य, प्रकाश आष्टे, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक उपस्थित होते.


 
Top