धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव जिल्ह्याचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष व सर्वांचे आधारस्तंभ  महेंद्र काका धुरगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज  यांची प्रतिमा व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

धाराशिव जिल्हामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराघरामध्ये पोहोचविणारे, जिल्ह्यामध्ये पक्षाला उभारी देणारे कार्य तत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांचा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी  धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे,धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, कळंब तालुकाध्यक्ष शिवाजीराव लकडे,सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे,सा.न्याय मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष विवेकानंद साळवे,सेवादल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र शिवसागर,आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सलीम हन्नुरे, किसान सेल जिल्हाध्यक्ष प्रकाशराव बावणे,महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण,अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष महमंद अबूबकर कोतवाल, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने,वाशी युवक तालुकाध्यक्ष अविनाश काटवटे, कलंब तालुका उपाध्यक्ष आगतराव कापसे,धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष रुक्मिणी कुंभार,सुरेखा चव्हाण, धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे, धाराशिव महिला शहराध्यक्ष सुलोचना जाधव, तुळजापूर सा.न्याय तालुकाध्यक्ष विनोद जाधव, तुळजापूर विद्यार्थी तालुकाध्यक्ष सोहेल बागवान, कळंब आदिवासी सेल तालुकाध्यक्ष विशाल काळे,धाराशिव तालुका संघटक प्रशांत शिंदे,केशेगाव जि.प.गटप्रमुख लिंबराज लोखंडे, आंबेजवळगाव जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड,धाराशिव तालुका सचिव सुजित बारकुल,विनोद अवतारे,खंडू नवले तसेच  सहकारी उपस्थित होते.


 
Top