धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे  पदाधिकारी,कार्यकर्ते सहकारी व अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील पदाधिकारी,कार्यकर्ते, सहकारी व अजित दादा राष्ट्रवादी प्रेमी यांची आढावा बैठक आज (दि.12 )जिल्हा कार्यालय धाराशिव येथे ही बैठक बोलाविण्यात आली.

महायुती मधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला उस्मानाबाद लोकसभा ची उमेदवारी मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.उपस्थित पदाधिकारी यांनी आपले पक्षासाठी मनोगत व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी 18 जुलैपासून पदभार स्वीकारल्यापासून ते आजपर्यंतची वाटचाल पदाधिकाऱ्यांच्या समोर कथन केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्हा मध्ये एक नंबरची वाटचाल करणारा  ठरला आहे. याचे श्रेय संपूर्णतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते यांना जाते असे जिल्हाध्यक्ष यांनी आवर्जून सांगितले. आपल्या पक्षाला उमेदवारी मिळणे हे कुठेतरी आपल्यासाठी मोठी सुवर्णसंधी असून आपण आपल्या महायुतीचा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार भरघोस मतांनी विजयी करू त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सौ.अर्चनाताई पाटील यांना उमेदवारी मिळाली असून त्यांना भरघोस मतांनी लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी करू असा विश्वास उपस्थित पदाधिकारी यांनी दाखवून दिला. या बैठकीसाठी मल्हार पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील उपस्थित राहून उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीसाठी ज्येष्ठ नेते भास्करराव खोसे,जिल्हा कार्याध्यक्ष समीयोद्दीन मशायक,भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप, प्रदेश संघटक सचिव खलील पठाण,तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मलंग  शेख,अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शफी भाई शेख,धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड,कळंब तालुकाध्यक्ष शिवाजीराव लकडे,भूम तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंखे,परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे ,धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे,तुळजापूर शहराध्यक्ष महेश चोपदार, नळदुर्ग शहराध्यक्ष  अजित अण्णा जुनैदी, परंडा शहराध्यक्ष जावेद पठाण,राज्य प्रमुख वक्ता सेल सुशील शेळके, सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत शिंदे, धाराशिव जिल्हा युवक निरीक्षक श्रीकांत शिंदे,ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष संतोष भाकरे आदी तसेच  या बैठकीसाठी धाराशिव जिल्हा भरातून प्रमुख नेते पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी व अजित पवार राष्ट्रवादी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top