धाराशिव (प्रतिनिधी)-ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात इन्कम टॅक्सच्या माध्यमातून काँग्रेसची खाती गोठवण्यात येत असल्याच्या निषेधार्थ धाराशिव येथे जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी (दि.2) निदर्शने आंदोलन करण्यात आले. नही चलेगी नही चलेगी, तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनानंतर जिल्हाधकाऱ्यांमार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज पाटील यांनी, भारतीय जनता पार्टीच्या वतीने राजकीय सुडबुद्धीने हे षडयंत्र रचले जात असल्याचे मत व्यक्त केले. केंद्र सरकार हे इन्कम टॅक्सच्या माध्यमातून काँग्रेसला याआधी 1800 कोटी आणि आता 3500 कोटीचा कर भरण्यास सांगत  आहे. वास्तविक माहितीच्या अधिकारातून उघड झालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी सुमारे 4617 कोटी रुपये कर भरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा उघडउघड पक्षपातीपणा आहे. या प्रकाराचा निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, वरीष्ठ उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डॉ. स्मिता शहापूरकर, विलास शाळू, विजयकुमार सोनवणे, नानाभाऊ भोसले, तालुकाध्यक्ष पांडूरंग कुंभार, रोहित पडवळ ॲड. हनुमंत भालेराव,ॲड. सुभाष राजोळे, रुपेश शेंडगे, राजेश शिंदे, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, रमेशसिंह परदेशी, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, उमेशराजे निंबाळकर, सिध्दार्थ बनसोडे, विनोद वीर, आनंदराव घोगरे, महेश देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top