धाराशिव (प्रतिनिधी)-चार गावचा महाराष्ट्र राज्य प्राधिकरणचा बंद पडलेला पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.  

जिल्हा परिषद धाराशिव येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. मैनाक घोष यांना ढोकी, तेर, कसबे तडवळा व येडशी या चार गावचे पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर चालू करावी. या भागातील नागरिक  बोरवेल व विहिरी मधील पाणी पातळी अटल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करत आहेत. येणाऱ्या काळात अजून जास्त दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतील. त्यामुळे आपण लवकरात लवकर ढोकी व चारगाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करावी यासाठी निवेदन देण्यात आले व चर्चा करण्यात आली. येत्या पंधरा दिवसात ढोकी व चारगाव पाणीपुरवठा योजना चालू नाही झाली तर लोकशाही मार्गाने जिल्हा परिषद समोर तीव्र आंदोलन ढोकी, कसबे तडवळा, येडशी व तेर या गावाच्या नागरिकांच्या वतीने करण्यात येईल. असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.


 
Top