धाराशिव (प्रतिनिधी)-उस्मानाबाद लोकसभा मतदार संघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून, निवडणूक कामाचे आदेश पुरुष कर्मचाऱ्यांबरोबर महिला कर्मचारी यांना सुद्धा प्राप्त झाले आहेत.  मतदान केंद्रावर असणाऱ्या असुविधा तसेच विविध प्रापंचिक अडचणींचा विचार करता महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ शकते. यामुळे महिला कर्मचाऱ्यांना निवडणुकीची ड्युटी देण्यात येऊ नये. असे निवेदन जिल्हाधिकारी  यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा शाखा धाराशिवच्या वतीने देण्यात आले आहे. 

जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, राज्य नेते बशीरभाई तांबोळी, राज्य महिला प्रतिनिधी सविताताई पांढरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे यांच्या स्वाक्षरी आहेत.


 
Top