धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील गवळी गल्लीतील  शतकानुशतकापासून चालत आलेल्या परंपरेनुसार होळी सण व उत्सव अत्यंत आनंदाने व उत्साहाने साजरा होतो. गवळी गल्लीमध्ये गोवऱ्याची मानाची होळी मानली जाते.  होळीच्या माध्यमातून रात्रभर जागरण करून कलगीतुरा, लोकगीते, संस्कृती गीते, व्यसनमुक्ती गीते, गवळणी, पोवाडे इ. यातून सर्व युवक पिढीला व्यसनमुक्तीचा संदेश दिला जातो. या होळीतून वाईट गुण, विकृती व अहंकार सर्व नष्ट होऊन मानवतेच्या कल्याणासाठी धर्माने जगावे असा हा उत्सव साजरा करण्या पाठीमागचा उद्देश आहे. सणातून लोकसंस्कृतीची जाण निर्माण करून देतात. गवळी गल्लीतील होळी पेटविण्यापूर्वी श्री गजाननाची व श्री तुळजाभवानी मातेची पूजा व आरती करून प्रा. गजानन गवळी, काशिनाथ दिवटे, नंदकुमार हुच्चे,संजय पाळणे,विश्वास दळवी, वरुण साळुंके, वैभव अंजीखाने, संदिप, सागर पाळणे, जावळे, गोट्या सापते, राजकुमार दिवटे, अतुल ढोकर, उपाध्ये आकाश सुरवसे, भालचंद्र हुच्चे, लहान मुले व मुली यांनी बोंब मारून आनंद साजरा केला.  तरुण पिढीने बोंब मारीत होळीभोवती प्रदक्षिणा घालून होळीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे.


 
Top