भूम (प्रतिनिधी) “ गण गणात बोते “ या जयघोषात श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा येथील वाशी रोडवरील मंदीरात उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. शहरात आसलेल्या वाशी रोडवरील श्री संत गजानन महाराज मंदीरात प्रगटदिनाचे औचित्य साधुन श्री च्या मुर्तीस महाअभिषेक सकाळी 10 ते 1 या वेळेत हभप भैय्या महाराज धारकर कासारी ता. भूम यांचे काल्याचे किर्तन होवुन फुले उधळून प्रगट दिन साजरा करण्यात आला.

यानंतर दहीहंडी महाआरती महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले. या शिवाय गेल्या तीन दिवसापासून या ठिकाणी हिवरा व उळूप येथील भजन महिला भजन आदी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी श्री संत गजानन महाराज व्यापारी मंडळानी विषेश परिश्रम घेतले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगर पालिका यांच्या वतीन भविकांना प्रसादासाठी मोठा हॉल बांधुन देण्यात आला. या हॉलचे लोकार्पन हभप भैय्या महाराज धारकर यांच्या हस्ते नारळ फोडून भाविकांना प्रसाद वाटप करून खुले करण्यात. यावेळी व्यापारी सेवा मंडळाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.


 
Top