धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय काँग्रेसच्या वतीने राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण देशभरात भारत जोडो यात्रा सुरु आहे. सदरील यात्रेत अमेठी (रायबरेली) येथे इंडियन ओवरसीस काँग्रेसचे विदेशातील अध्यक्ष आणि देशभरातील महत्त्वपूर्ण व्यक्तींच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाकरिता धाराशिव जिल्ह्यातून धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष खलील सय्यद यांना निमंत्रित करण्यात आले होते.

परिसंवादात देश-विदेशातील काँग्रेस नेत्यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी धाराशिव येथील खलील सय्यद यांनीही काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि आगामी काळात पक्षाची रणनीती याविषयी विचार मांडले. दरम्यान काँग्रेसचे युवक नेते राहुल गांधी यांच्याशी धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष खलील सय्यद यांनी संवाद साधून धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top