धाराशिव (प्रतिनिधी)-तालुक्यातील ढोकी येथील सौ.स्नेहलता देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृती परीक्षेत घवघवीत यश संपादित केले. या यशाबद्दल शाळेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या शाळेतील विद्यार्थिनी साक्षी बापू पवार (100 गुण) प्रथम, अनुष्का प्रवीण कांबळे (91) द्वितीय, योगीता सुनिल सुरवसे (72) तृतीय, तसेच ऋतुजा माणिक धबाले (70) यांनी शाळेचा गुणगौरव वाढविला. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एस. जी. कळकुंबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास एम. आर. चव्हाण, डी. एस. कुरळे. पी. एस. गोळे, एस. एस. पुंड, बी. एस. कांबळे, बी. व्ही. पाळवदे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित. होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डी. एस. कुरूळे यांनी केले.


 
Top