सोलापूर (प्रतिनिधी)-मध्य रेल्वे चा सोलापूर विभाग हा हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहे. त्यासाठी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्यात येत आहे .  

सोलापूर विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षातील सौर ऊर्जा प्रकल्प निर्मितीची एकूण उद्दिष्ट ओलांडून 56.034  सौर ऊर्जा निर्मिती क्षमता यशस्वीरित्या विकसित केली आहे.

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या अंतर्गत असणाऱ्या एकूण रेल्वे विभागाच्या एकूण 13 अश्या विविध कार्यालय आणि स्टेशन जसे की (सोलापूर रेल्वे हॉस्पिटल,टिकेकरवाडी,सांगोला,अरग,आर पी एफ बैरेक-अहमदनगर,राहुरी स्टेशन ,पुंताम्बा स्टेशन,अकोळनेर स्टेशन,बार्शी टाउन ,धाराशिव,वडशिंगे,सलगरे आणि तिलाटी) अश्या ठिकाणी एकुणात 125.5 किलोवॅट चा प्लॅन्ट बसविण्यात आला आहे. 

त्यापासून एप्रिल-2023-24 या चालू आर्थिक वर्षात 56.034 MWP सौर ऊर्जा निर्मिती केली आहे.त्यापासून 5,68,398 रुपयांची बचत करण्यात आली आहे.

या पर्यावरण पूर्वक उपक्रमासाठी मंडल रेल्वे व्यवस्थापक श्री. नीरजकुमार दोहारे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले , शिवाय वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता श्री. अभिषेक चौधरी यांच्या देखरेखीखाली हि योजना व्यवस्थित रित्या पार पडत आहे. येणाऱ्या काळात सोलापूर विभागांत 335 किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प निर्माण करण्याचा निर्धार आहे.अश्या प्रकल्पाच्या ध्येयांमुळे येणाऱ्या काळात सोलापूर विभागाची इलेक्ट्रिसिटी आणि पैश्यांची मोठी बचत होईल.तसेच कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी याची मदद होईल.


 
Top