धाराशिव (प्रतिनिधी)-आज सादर करण्यात आलेला अंतरिम अर्थसंकल्प युवकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा असून संशोधन आणि नाविन्यपूर्णतेसाठी 1 लाख कोटी व भांडवली गुंतवणुकीसाठी 11 लाख 11 हजार 111 कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक देण्याचे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे देशात आधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीसोबत तरुणांसाठी असंख्य नवीन रोजगार संधी तयार होणार आहेत.
रुफटॉप सोलर योजनेतून देखील स्थानिक युवकांना रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी मिळणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात वर्षातील 300 दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो त्यामुळे धाराशिव शहरात रूफ टॉप सोलर योजना राबविण्यासाठी आपण 13 वर्षांपूर्वी प्रयत्न केला होता मात्र तत्कालीन सरकारने याबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याने हा विषय प्रलंबित राहिला होता आता मात्र मोदींजींच्या नेतृत्वाखाली सरकारने याबाबत सकारात्मक निर्णय घेतल्याने धाराशिवच्या नागरिकांना मोफत वीज उपलब्ध होणार आहे. नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक असणारा हा अंतरिम अर्थसंकल्प युवा, गरीब, महिला आणि शेतकरी या 4 स्तंभांना सक्षम करून 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची हमी देणारा आहे.